💥परभणी जिल्ह्यातील तिन दिवसाच्या संचारबंदी नंतर उद्या दि.29 मे रोजी शिथिलता...!💥जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी/ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणा-या रुग्णांच्या संख्येत दिवस् दिवस वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 26 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून 28 मे रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तीन दिवस लागू केलेल्या संचारबंदीस शिथिलता बहाल केली आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सेवांसह यापुर्वी सुट दिलेल्या शेतमाल खरेदी, विक्री, बि बियाणे,खते,कृषीविषयक साहित्य,कृषीपूरक अन्य जोडउद्योग, रस्ते अन्य बांधकामे, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल अन्य सेवांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. 31 मे पर्यंत ही मुभा असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर बोलतांना दिली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी परभणी महानगरपालिका हद्द, लगतचा पाच किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांची हद्द व तीन किमीच्या परिसरात दि.26 मे सकाळी 7 पासून ते दि.28 मे च्या मध्यरात्री 12 बारा वाजपर्यंत संचारबंदी लागू केली होती.या काळात अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या अन्य सेवांना परवानगी असणार नाही, असे स्पष्टपणे नमुद केले होते.या पार्श्‍वभूमीवर तब्बल तीन दिवस परभणी शहरासह तालुकास्थानी कमालाची शुकशुकाट होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या