💥परभणी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची मुदत वाढविली...!


💥जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आदेश जारी केले💥

परभणी, दि.16 :- जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे दि . 17 मे 2020 पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. जिल्हयात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि . 13 मार्च 2020 रोजी पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 चे मनाई आदेशाची मुदत सोमवार दि .25 मे 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
               जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दि.22 मार्च 2020 व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी दि . 25 मे 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे.  ज्या आस्थापनांना व  अत्यावश्यक बाबींना सूट दिलेली आहे. त्या दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत सूरु राहतील. तर ज्या आस्थापना, दुकानांना सूट दिलेली नाही ती बंदच राहतील. तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व सुधारीत आदेश  या कालावधीत संपूर्ण जिल्हयात अंमलात राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                           -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या