💥परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी 15 जूनपर्यंत नोंदणी करावी - जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर



💥जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी दि. 15 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करावी💥

परभणी,दि.31 :-  कोरोना महामारी आणि त्यामुळे विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणुन लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय अन्नधान्य वितरण व अन्य मदत सुलभतेने होण्याच्या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची माहिती ऑनलाईन संकलीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी  जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी सोमवार दि. 15 जून 2020 पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.

           जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे https://parbhani.gov.in/registration-for-divyang ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी या ऑनलाईन प्रणालीत दिव्यांग व्यक्तींचे नातेवाईक , मित्र किंवा संपर्कातील अन्य कोणीही दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करू शकतील. दिव्यांगांची नोंदणी करतांना दिव्यांग व्यक्तींचे नाव , संपुर्ण पत्ता , दिव्यांग व्यक्तीचा किंवा संपर्कासाठी इतरांचा मोबाईल क्रमांक , मतदार यादीत नाव असल्यास भाग क्रमांक , गाव  व अनुक्रमांक तसेच आधार क्रमांक , दिव्यांगाचा प्रकार , टक्केवारी , जन्मतारीख , शिधापत्रिका असल्यास शिधापत्रिकेचा क्रमांक , दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक या संपूर्ण माहितीसह सोबत दिव्यांगाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. ही लिंक दि. 31 मे 2020 पासून कार्यान्वित झाली असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी दि. 15 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करावी. असेही  कळविण्यात आले आहे...
           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या