💥परभणी जिल्ह्यात 1091 पैकी 1028 स्वॅब निगेटीव्ह आज रुग्णालयात 40 संशयित दाखल...!💥जिल्ह्यात एकूण 1104 कोरोना संशयितांची नोंद💥

परभणी, दि.09(प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि.9) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 40 संशयित दाखल झाले असून त्यामुळे संशयितांची संख्या 1104 पर्यंत पोचली आहे.
1091 पैकी 1028 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.44 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी 40 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
एकूण 1104 संशयितांची नोंद झाली असून विलगिकरण कक्षात 399, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 44 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 661 जण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या