💥परभणी जिल्हा शासकीय रुग्नालयात आज 108 संशयीत दाखल आता 311 अहवालाची प्रतिक्षा...!



💥जिल्ह्यात आता एकून संशयितांची संख्या 2128💥

परभणी/ कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज गुरूवार दि.28 मे 2020 रोजी सायं.०5-०० वाजेपर्यंत एकूण 108 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2128 पर्यंत पोचली आहे. 311 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.
एकूण 2246 पैकी 1782 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 67 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 61 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 311 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून गुरूवारी एकूण 183 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. गुरूवारी 44 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले.  जिल्हा शासकीय रूग्णालयात गुरूवारीपर्यंत विलगिकरण कक्षात 523, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 342 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1263 जण आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या