💥दिलासादायक अडकलेले मजूर,विद्यार्थी घरी जाऊ शकणार...!



💥वाशिम जिल्ह्यातील पालकांना मिळाला दिलासा,फुलचंद भगत यांच्या मागणीला यश💥

💥परराज्यात अडकलेल्यांना गावी आनन्याच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु💥

वाशिम(फुलचंद भगत)-दिल्लीमध्ये प्रशासकीय सेवेची तयारी करणारे विद्यार्थी,मजुर लाॅकडाऊनमुळे अडकुन पडल्याने त्यांनी गावी आनन्यासाठी वाशिमच्या जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा आणी पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली होती अखेर ही मागणी फलश्रृत झाली असुन गृहमंञालयाकडुन आता याविषयी सुचना आल्या असुन परराज्यात अडकलेले विद्यार्थी ,मजुर यांना आता गावी आनन्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन हालचाली सुरु झाल्यांने जिल्हावाशीयांना दिलासा मिळाला आहे.
        गृहमंञालयाकडुन  परराज्यामध्ये अडकलेले मजूर, प्रवासी, तिर्थयात्री, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासाठी नियमावली बनविली असून त्याद्वारेच परराज्यातील लोकांना पाठविता किंवा आणता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशाच्या नागरिकांना लांब ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले होते. मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकून पडले होते. आता केंद्र सरकारने या त्रासलेला लोकांना मोठा दिलासा दिला आहे.मजूर, प्रवासी. तिर्थयात्री, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासाठी नियमावली बनविली असून त्याद्वारेच परराज्यातील लोकांना पाठविता किंवा आणता येणार आहे. राजस्थानातील कोटामध्ये हजारो विद्यार्थी अडकले होते. महाराष्ट्रापासून अनेक राज्यांनी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती.गृहमंत्रालयाने केलेल्या नियमावलीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच या अडकलेल्य़ा नागरिकांना परत आणण्यासाठी एका एसओपीची तैनाती करावी लागणार आहे. यानंतर या राज्यांना एकमेकांसोबत इच्छुक लोकांसाठी चर्चा करावी लागणार आहे.
याचबरोबर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच या लोकांना पुढे सोडण्यात येणार आहे. या लोकांना स्थानिक प्रशासनाकडून क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच या लोकांना आरोग्य सेतू अॅप वापरासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.या अडकलेल्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी बस वापरण्याची सूचना करण्यात येणार आहे. मात्र, या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार नागरिकांना बसविण्याची अट घालण्यात आली आहे.सर्व प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण केल्यावर परराज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये अडकलेल्यांना आनन्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाल्याने जिल्हावाशियांना दिलासा मिळाला असुन वाशिममधलेही बहुतांश विद्यार्थी,मजुर परराज्यात अडकुन पडल्याने सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाला साकडे घातले होते.अखेर ही बाब निकाली निघुन बाहेर राज्यातील अडकलेल्यांना गावी आनन्याचा मार्ग आता मोकळा झाल्याने निश्चीतच दिलासा मिळाला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या