💥पुर्णेतील प्रतिष्ठित सराफा व्यापारी किरण अशोकराव कुल्थे यांनी कारागीर कुटुंबांना दिला मदतीचा आधार...!💥लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या कारागीर कुटुंबांवर उपासमारीची वेळ💥

पुर्णा/संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या 'कोरोना व्हायरस' या जागतिक महामारी म्हणून उदयास आलेल्या जिवघेण्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० रोजी २१ दिवसांच्या लॉक-डाऊनची घोषणा केली.ऐन लग्न सराईच्या काळात लॉक-डाऊन व संचारबंदी घोषित करण्यात आली यानंतर १४ एप्रिल २०२० रोजी संपणाऱ्या लॉक-डाऊचा कालावधी पुन्हा ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढवण्यात आला त्यामुळे सोन्या-चांदीच्या व्यवसायाशी संबंधित हातावर पोट असलेल्या रोजमजूर कारागीरांसह त्यांच्या कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली या भयंकर परिस्थितीत त्यांना सहकार्याची अपेक्षा असतांना त्यांच्या मदतीसाठी हात मदतीचा...या ग्रुपच्या मान्यवर सदस्यांनी काही कारागीरांना मदत केली परंतु या व्यवसायाशी निगडीत बरेच कारागीर मदती पासून वंचित राहिल्याने त्यांना आज सोमवार दि.१३ एप्रिल २०२० रोजी समाजातील जेष्ठ नागरिक तथा प्रतिष्ठित व्यापारी श्री.अशोकराव कुल्थे व त्यांचे सुपूत्र तथा सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित सराफा व्यापारी सराफा व्यापारी असोशिएशनचे मा.अध्यक्ष किरण अशोकराव कुल्थे यांनी ३५ रोजमजूर कारागीर कुटुंबांना स्वतः मदतीचा खंबीर आधार देत जिवनावश्यक वस्तु ज्यात गहू,तांदूळ,साखर,गोडतेल,तुरदाळ,मिठ,चहापत्ती,पोहे,अंगाचा साबन,कपड्याचा साबन अश्या किटचे वाटप केले.लॉक-डाऊन व संचारबंदीच्या या अटीतटीच्या काळात किरण कुल्थे यांनी तब्बल ३५ रोजमजूर कारागीरांना मायेचा आधार दिल्याने त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या