💥राष्ट्रपती कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनफॉलो का केलं..?;‘व्हाइट हाऊस’नं दिलं स्पष्टीकरण...!💥यासंदर्भात व्हाइट हाऊनसकडूनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे💥

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलवरून अनफॉलो करण्यात आल्यानंतर भारतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. अचानक अनफॉलो करण्याचा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भात व्हाइट हाऊनसकडूनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाउस’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, त्यानंतर अचानक काल दि.२९ रोजी  व्हाइट हाउसनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केल्याचं समोर आलं. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाइट हाउसनं अनफॉलो केल्यामुळे मी खूप निराश झालोय. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
दरम्यान, या प्रकरणावर चर्चा सुरू असतानाच व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटींवर ‘पीटीआय’ला यासंदर्भात माहिती दिली. “व्हाइट हाऊसचे ट्विटर हँडल अमेरिकनं सरकारच्या इतर ट्विटर हँडलचं अनुकरणं करते आणि त्यानुसारच काम केलं जातं. उदारणार्थ राष्ट्रध्यक्षांचा एखाद्या देशात दौरा असेल, तर त्या दौऱ्यापूर्वी यजमान देशातील महत्त्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केलं जातं. कारण दौऱ्याविषयीचे यजमान देशाच्या अधिकृत ट्विटर हँडल करण्यात आलेले ट्विट रिट्विट केले जातात. त्यानंतर पुन्हा अनफॉलो केलं जातं. केवळ दौऱ्यादरम्यान मर्यादित कालावधीसाठी असं केलं जातं,” असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीतील नियोजित भारत दौऱ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाचे ट्विटर हँडल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांचं ट्विटर हँडल फॉलो केलं होतं. २९ एप्रिल रोजी अनफॉलो करण्यात आलं....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या