💥चुडावा उप केंद्रातील तीन गावांना ५ तासचं विद्युत पुरवठा...!💥विद्युत पुरवठा सुरळीत करा; छावा युवक जिल्हा अध्यक्ष गजानन सवराते यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन💥

चुडावा/ प्रतिनिधी - तालुक्यातील चुडावा ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आलेगाव,पिंपरण,कलमुला या गावात स्थानिक अधीका-यांच्या दुर्लक्षामुळे महावितरण कडून घरगुती व शेतीसाठी केला जाणारा विद्युत हा केवळ ५ तासच मिळत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन छावा जिल्हा अध्यक्ष गजानन सवराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
            पूर्णा तालुक्यातील चुडावा उपकेंद्रा अंतर्गत परिसरातील जवळपास १५ ते २० गावात घरगुती व शेतीसाठी विद्युत पुरवठा केला जातो.मागील एक ते दिड महीन्यापासून आलेगाव,पिंपरण,कलमुला या गावात २४ तासात केवळ ५ तासच विज मिळत आहे. सद्धया उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतातील भुईमूग,उस, संत्रा मोसंबी आंब्याच्या बागा तसेच शेतातील भाजीपाला पाण्या अभावी वाळून जात आहे.याबाबत पुर्णेचे उप अभियंता यांना गावकऱ्यांनी भेटुन प्रत्यक्ष व्यथा मांडली. परंतू अभियंत्याकडुन जी विज मिळते त्यात भागवा अशी उत्तरे मिळाली.
       कोरोना पार्दूभाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदी जमावबंदीचे लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.त्यातच गावात शेतातील हाता तोंडाला आलेला भाजिपाला व उभी पिकांचे पाण्या अभावी मोठं नुकसान होत आहे.परंतू महावितरण कंपनीचे अधीका-यांकडून सदरील गावकऱ्यांना सापत्याची वागणूक मिळते.यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांसह छावा युवक जिल्हा अध्यक्ष गजानन मारोती सवराते यांनी बुधवारी २९ रोजी परभणी जिल्हाधीकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीन्ही गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करुन द्यावा यासाठी साकडे घातले.एक निवेदन दिले आहे निवेदनावर आलेगांव,पिंपरण,कलमुला गावचे सरपंच ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या