💥शेतकर्‍यांना खते,बियाणे वेळेव उपलब्ध करून द्या - पालकमंत्री नवाब मली



💥परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम 2020 पूर्वतयारीची आढावा बैठक आज घेतली💥

परभणी, (प्रतिनिधी)- परभणी येथ्लृील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक विकास व औकाङ्ग कौशल्य विकास व उद्योजकता तथ्लृा परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम 2020 पूर्वतयारीची आढावा बैठक गुरुवार, 30 एप्रिल रोजी घेतली. यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते, बियाणे शेतकर्‍यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. तसेच महावितरणच्या ट्रान्सङ्गार्मरबाबत बर्‍याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या.

परभणी येथ्लृील खरीप हंगाम 2020 पूर्व आढावा बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीस खा.संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.राहूल पाटील, आ.मेघना बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थ्लिृत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ङ्गिजीकल डिस्टन्स ठेवून तसेच तोंडाला मास्क बांधून या आढावा बैठकीत सर्वांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंंगाम 2019-20 मध्ये शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणार्‍या बियाणे योग्य शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी असे सूचविले. तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपा संदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळे घ्यावेत. तसेच वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा. खा.संजय जाधव, आ.डॉ.राहूल पाटील यांनीही पालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत शेतकर्‍यांचे ट्रान्सङ्गार्मर जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकर्‍यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे, महावितरणचे अभियंता जायभाये आदींची उपस्थ्लिृती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या