💥पुर्णेतील सिटीप्राईड बिअरबारचे शटर वाकवून चोरट्यांनी पळवला ७७ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा...!



💥लॉक-डाऊन संचारबंदीत अज्ञात चोरट्यांनी पोलीस प्रशासनाला दिले उघड आवाहन💥

पुर्णा/कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातही सर्वत्र लॉक-डाऊन संचारबंदीसह कडक नाकेबंदी असतांना अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह सर्वसामान्य जनतेला दिवसा साधे मोटारसायकलवर फिरनेही पोलीस प्रशासनाकडून अवघड करण्यात आले आहे मात्र अवैध देशी-विदेशी दारु,अवैध गुटखा,अवैध चोरट्या रेतीची वाहतूक करणारी वाहने मात्र शहरासह तालुक्यात अगदी सहज मार्गक्रमण करतात कशी ? असा प्रश्न उपस्थित होत असतांनाच
तालुक्यात चोरट्यांनीही अगदी निर्भयतेने मुक्तसंचार करण्यास सुरूवात केल्याचे दिसत असून तालुक्यातील पुर्णा-झिरोफाटा रोडवरील माटेगाव येथे मा.जिल्हा परिषद सदस्य तथा माजी पंचायत समिती सभापती साहेबराव बोबडे यांच्या घरी दि.२६ एप्रिल ते २७ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २,६०,६४०/-रुपयांच्या केलेल्या धाडसी घरफोडीची घटना ताजीच असतांना अवघ्या तिन दिवसाच्या कालावधीत याच पुर्णा-झिरोफाटा रोडवरील सिटी प्राईड बिअरबार रेस्टॉरंट या बिअरबारचे शटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी ७७,०१५/-रुपयांचा विदेशी दारुचा साठा पळवल्याची घटना दि.३० एप्रिल रोजी रात्री १२-०० ते सकाळी ०४-१५ वाजेच्या दरम्यान घडली असून या घटने मुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून
पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.भुमे यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.दरम्यात सिटीप्राईड बिअरबार व रेस्टॉरंट मधील चोरीच्या घटनेत चोरट्यांनी विदेशी दारु इम्पारिअल ब्लू १८० मिलीच्या २०३ बॉटल प्रत्येकी किंमत १४० एकून किंमत २८४२०/-रुपये,विदेशी दारु रॉयल स्टेग २० बॉटल  प्रत्येकी १७० रुपये किंमत एकून किंमत ३४००/-रुपये,विदेशी दारु मेगडॉल नं.१-१८० मिली ३८ बॉटल प्रत्येकी किंमत १५० रुपयें तर ९० मिली १० बॉटल प्रत्येकी किंमत ९० रुपये एकून ६८००/-रुपये,मास्टर ब्लॅन्ड १८० मिली ४८ बॉटल प्रत्येकी बॉटल १३० रुपये व ९० मिलीच्या ९० बॉटल प्रत्येकी ७० रुपये एकून १२५४०/-रुपये,ब्लॅन्डर विदेशी दारुच्या १८० मिलीच्या १० बॉटल प्रत्येकी ३२० रुपये व ९० मिलीच्या ६ बॉटल प्रत्येकी १९० रुपये एकून ४३४०/-रुपये,विदेशी दारु सिग्निचर १८० मिलीच्या ५ बॉटल व ९० मिलीच्या ६ बॉटल प्रत्येकी १९० रुपये एकून किंमत २७४०/-रुपये,विदेशी दारु अॉफिसर चॉईस १८० मिलीच्या ९० बॉटल प्रत्येकी १४० रुपये एकून १२६००/-रुपये,विदेशी दारु डिएसपी ९० मिलीच्या ८५ बॉटल प्रत्येकी किंमत ७५ रुपये एकून ६३७५/- असा तब्बल ७७०१५/-रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी कडक नाकेबंदी तोडून पळवल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात चोरट्यांची दहशत निर्माण झाल्याचे दिसत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या