💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा...!



💥जिल्ह्याचे पालकमंत्री नवाज मलीक यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन💥

परभणी दि.1 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
           यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
                        -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या