💥सरकारचा महत्वपुर्ण निर्णय कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना करणार अर्थसाह्य मिळणार ?



💥युनिवर्सल बेसिक इन्कमद्वारे (यूबीआय) मदत करण्याचा विचार💥

कोरोनामुळे अनेकांना घरीच राहावं लागत आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कोरोनाचा रोजगारावर परिणाम होणाऱ्यांना युनिवर्सल बेसिक इन्कमद्वारे (यूबीआय) मदत करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पद्धतीने कोणत्याही अटीविना आर्थिक मदत संबंधितांना केली जाईल.

कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाºयांना, पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे रोजगार करणार्यांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल. तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडणे शक्य होईल.

ही रक्कम देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट सरकार घालणार नाही. रोजगार गेल्याने हातात पैसा नसल्यामुळे संबंधितांना जगता यावे, यासाठी ही रक्कम असेल, असे वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व हाँगकाँगसह काही देशांनी अशी रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशची घोषणा -

युनिवर्सल बेसिक इनकम योजनेद्वारे सरकार काही लाख लोकांना अशी मदत करू शकेल. ज्यांना कामावर जाण्याची आणि घरी बसण्याचीच सक्ती करण्यात आली आहे, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल. उत्तर प्रदेश सरकारने असंघटित क्षेत्रातील आणि ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे, अशांना ठराविक रक्कम देण्याची घोषणा केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या