💥पुर्णेच्या भुमिपुत्र पोलीस कर्मऱ्याने मानुसकीची भावना जोपासत उपाशी भिकारी दाम्पत्याला दिला मदतीचा हात..!
💥परभणीतील कोतवाली पोलिस स्थानकात पोलिस स्थानकात कार्यरत नितीन कसबे कर्तृत्वाला सलाम💥

पूर्णा/ कोरोना विषाणूच्या सावटाखाली संपूर्ण जग असून लाॅकडाऊनमुळे गोरगरिब भिकारी यांचे मोठे हाल होत आहेत.परंतू देव अश्या संकटात कोणाच्या ना कोणाच्या रूपाने देवदुत पाठवतोच असेच काही परभणी शहरात बसस्थानक परिसरात एका वयोवृद्ध भिकारी दाम्पत्यासमोर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस जवान नितीन कसबे यांनी धाव घेऊन संकटकाळी मदतीचा हात दिला.त्या़च्या ख-या पोलीसीला सलाम...
          पोलीसांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच प्रश्र्नचिन्ह निर्माण केले जाते परंतु त्यांच्या आतील असलेल्या मानसाच्या व त्यांच्या वर्तनाचे मात्र फार कमी कौतुक होतांना दिसते.सध्या जगभरात कोरोना विषाणू(कोविड-१९) या आजाराने थैमान घातले असून त्यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी देश लाॅकडाऊन सारख्या परिस्थिती ला सामोरे जात आहे.असे असताना जे सुखी समाधानी आहेत ते मात्र आपल्या जिवाच्या भितीपोटी घरात आहेत.तर घरात बसलेल्यांसाठी आपल्या कुटुंबाची स्वत;च्या आरोग्याची काळजी न करता दिवसरात्र पोलीस, आरोग्ययंत्रणा दक्ष झाली आहे.अश्यातच विना आसरा असलेले गोरगरिब, भिकारी यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.परभणी बस स्थानक परिसरात अश्याच एका वयोवृद्ध भिकारी दाम्पत्याला अन्नतर सोडाच परंतु पाणीही प्यायला मिळत नव्हते अश्यातच परभणी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पो‌.काॅ.तथा पुर्णेचे भुमिपुत्र नितीन कसबे यांनी आपली डृयुटी बजावताना त्यांना उन्हात अन्न पाण्यावाचुन फुटपाथवर बसलेले वयोवृद्ध भिकारी दाम्पत्य दिसले.त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना खिचडीचे जेवण व बिसलरी पाण्याच्या बाटल दिल्या.जेवन व पाणी मिळाल्याने त्या वृद्धांना अश्रु अनावर झाले. 
        एरवी कोणताही बंदोबस्त असो पोलीस मारहाण करतात म्हणुन त्यांच्यावर आरोप होतात तर संकटकाळी धाऊन जातात हे ही येवढेच खरं आहे.या तरुण तडफदार नितीन कसबे यांनी दाखवलेल्या कर्तबगारीला त्रिवार सलाम जयहिंद 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या