💥म.फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - धनंजय मुंडे


💥मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत मुंडे बोलत होते💥

मुंबई, (प्रतिनिधी) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक झाली त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.

            श्री. मुंडे म्हणाले, अनुसूचित जाती, सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना, थेट कर्ज योजना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कर्जांची वसुलीही होणे आवश्यक आहे. महामंडळामार्फत कौशल्य व प्रशिक्षण योजनांचे नवीन प्रस्ताव सादर करण्यात यावेत.

            महामंडळाचे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच महामंडळातील रिक्त पदे व अन्य अडचणी सोडविण्यात येणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

            यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व अधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या