💥लातूरात तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून लिंगायत समाजावर सातत्याने अन्याय...!



💥लातूर जिल्हा परिषदेतील लिंगायत समाजाच्या पाच सदस्यांनी दिले भाजपा जिल्हाध्यक्षाकडे राजीनामे💥

उदगीर: जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लिंगायत समाजाला डावलले जात असल्याने लातूर जिल्हा परिषदेतील लिंगायत समाजाच्या पाच सदस्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षाकडे शनिवारी सामूहिकराजीनामा सोपवला आहे.नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसापासून लिंगायत समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. या समाजाच्या सदस्यांना जिल्हा परिषदेत सभापती निवडीत व विकास कामांमध्ये सातत्याने डावलले जात आहे. कुठल्याही महत्वाच्या समितीवर संधी दिली जात नाही. यावेळी झालेल्या सभापती निवडीत जुन्या सभापतींना डावलून लिंगायत समाजाच्या एकाला सभापती पदावर संधी देण्याची मागणी केली होती. मात्र जुन्या एका सदस्यांना पुन्हा सभापती पदाची संधी देऊन लिंगायत समाजावर अन्याय करण्यात आला आहे.मराठवाड्यामध्ये लिंगायत समाजाचे मतदार भाजपच्या अनेक दिवसां पासून पाठीशी असून लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ व विधान परिषदेवर समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. सातत्याने लिंगायत समाजाला डावलण्याचे काम भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्यावर लिंगायत समाज बांधवांचा राजीनामा देण्या साठी दबाव वाढत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देत असल्याचे पत्र जिल्हा परिषद सदस्य मिलिंद लातुरे, महेश पाटील,बस्वराजपाटील  कौळखेडकर,उषा रोडगे
विजया बिरादार, यानी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री कराड यांच्याकडे दिले आहे. अशी माहिती तोंडार जिल्हा परिषदेच्या सदस्या विजया बिरादार यांचे पती बसवराज बिरादार यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या