💥पुर्णा तालुक्यातील सातेगावात डेंगू सदृष्य आजाराची लागन..!💥कंठेश्वर प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.माजिद यांच्या निष्काळजीपणा मुळे रुग्णांचे हाल 💥

पुर्णा/तालुक्यातील सातेगाव येथे अनेक रुग्नांना डेंगू सदृष्य रोगाची लागण झाली असून कंठेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.माजिद यांच्या निष्काळजीपणा मुळे अनेक रुग्णांचे होत आहे.
आरोग्य अधिकारी डॉ.माजीद हे रुग्नांची व्यवस्थित तपासणी करत नाही असा आरोप रुग्नांच्या नातेवाईकांकडून होत आहे.डेंगू आजाराची लागन झालेल्या रुग्नांची नावे गजानन शिवनखेड,शोभा ठाकूर, प्रभाकर ठाकूर,अजय ठाकूर,सुलोचना ठाकूर अशी असून या रुग्नांची व्यवस्थित तपासणी केली नसल्यामुळे त्यांना पूर्णा,परभणी,नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते  या संदर्भात डॉ.माजिद यांना वारंवार सूचना करून सुद्धा ते या गंभीर आजारा संदर्भात गांभीर्य दाखवत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ.माजीद यांची  कंठेश्वर प्राथमिक केंद्रातून बदली करावी अशी मागणी शिवसेना सर्कल प्रमुख रमेश ठाकूर यांनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या