💥वसमत तालुक्यातील सिरळीत सिंहगड मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा...!💥भव्य राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा व शिव सामान्यज्ञान स्पर्धा संपन्न💥

 वसमत/तालुक्यातील सिरळी येथे सिंहगड मित्र  मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  सिरळी येथे शिवजयंती निमित्त सिंहगड मित्र मंडळाच्या वतिने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित भव्य राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा व शिव सामान्यज्ञान स्पर्धा संपन्न झाल्या असून  त्या कार्यक्रमाला प्रमुख  उद्घाटक म्हणून  वसमचे उपविभागिय अधिकारी प्रविणजी फुलारी, कन्हैया भैय्या बाहेती, माजी सैनिक अशोक नलगे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ.सौ.सुवर्णमाला अवधूत शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख विजय शिंदे,पंचायत समिती सौ.कल्पना ज्ञानेश्वर नलगे, तलाठी प्रियंका खडसे मॕडम, ग्रामसेवक गोलेवार साहेब, संरपंच गजानन पोटे, वंजारे सर,चंद्रकांत शिंदे, बापुराव शिंदे , आदींची उपस्थिती होती.शिवप्रतिमेच्या पुजन उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सिरळी ग्रामस्थ  व आयोजक सिंहगड मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या