💥परभणी जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी अवैध व्यवसाईकांकडून पत्रकारांना मिळताय धमक्या..!💥जिल्ह्याचे कर्तव्यकठोर कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय लक्ष देतील काय ?💥

परभणी/जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणी अवैध व्यवसाईकांतील आर्थिक हितसंबंधाला अडसर निर्माण करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाला सुरुंग लावणाऱ्या तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी आणी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीला वरीष्ट अधिकाऱ्यांनी लगाम लावला नाही तर लोकशाही संपुष्टात येऊन ठोकशाहीचे राज्य संपूर्ण जिल्ह्यात निर्माण होईल अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील  दैनिक देशोन्नतीचे निर्भीड पत्रकार शेख नईमोद्दीन कौसडीकर यांनी वाळू माफियांच्या विरोधात राजरोसपणे अवैध वाळू उपसा करण्याच्या कारणावरून वर्तमानपात्रात बातमी छापली होती तर पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पिबीएन न्युज या वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक धम्मपाल हणवते व संपादक दिपक कानडे यांना ताडकळस परीसरात चालत असलेल्या अवैध व्यवसाया संदर्भात बातमी का लावल्याने पित्त खवळलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने पिबीएन न्युज या वाट्सअप ग्रुपवर जाहीरपणे धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून जिल्ह्यात निर्भिडपणे वृत्तांकन करुन लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या पत्रकारांचे भविष्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. दैनिक देशोन्नतीचे निर्भीड पत्रकार शेख नईमोद्दीन कौसडीकर यांना वाळू तस्करी संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर वाळू माफिया धमक्या देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेसह ताडकळस येथील घटनेची जिल्हा पोलीस अधिक्षक उपाध्याय यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.या लोकशाही विरोधी गंभीर घटनां संदर्भात राज्यातील सर्वच पत्रकार संघांनी आप आपल्या कार्यक्षेत्रात तहसीलदार,पोलीस अधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन निषेध करावा व सदरील आरोपी विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यास भाग पाडावे अशी मागणी होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या