💥पालम तालुक्यात पुन्हा एका अन्नदात्या शेतकऱ्याने केली आत्महत्या...!💥पालम तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच,शेतकरीवर्ग चिंताग्रस्त💥


 पालम: तालुका प्रतिनिधी

 तालुक्यातील फेब्रुवारी महिण्याच्या सुरुवातीला केरवाडी येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक महिनाही झालेला नसताना तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की सततची नापिकी व कर्जामुळे झालेल्या शेतीची विक्री या दोन्ही गोष्टींना त्रासून हाताला काम लागत नसल्यामुळे वरखेड तालुका पालम येथील संग्राम भीमराव गरुड वय 50 वर्ष या शेतकऱ्याने गहाण ठेवलेली शेती सोडवून घेऊ शकत नाही या गोष्टीला कंटाळून दिनांक 20 फेब्रुवारी रात्री तीनच्या सुमारास रसायनिक विष घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. यामुळे गावात  शोकाकुल वातावरण असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
तालुक्यात  कर्जबाजारीपणा मुळे शेतकऱ्यां च्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील घटनेची पालम पोलीस स्टेशन मध्ये कलम 174 सीआरपीसी  नुसार चाटोरी बीट जमादार सावंत यांनी  नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माने साहेब यांच्या  मार्गदर्शनाखाली श्री सावंत करत आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या