💥परभणीचे कर्तव्यदक्ष व इमानदार जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर यांची फरफट..!



 💥नांदेड येथे झालेल्या बदलीचे आदेश २४ तासातच रद्द💥

नांदेड/परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर कर्तव्यदक्ष व इमादार जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर यांची नांदेड येथील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती अवघ्या २४ तासातच रद्द करण्यात आली. जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर हे परभणी जिल्ह्यात कार्यरत असतांना त्यांनी अत्यंत कठोरपणे अवैध गौण-खनीज वाळू तस्करी विरोधात प्रभावीपणे मोहिम राबवल्याने ते  वाळूमाफीयांचे कर्दनकाळ ठरले होते अश्या इमानदार व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांची नांदेड जिल्ह्याला आवश्यकता असतांना जिल्हाधिकारी पी.शीवा शंकर यांची नियुक्ती रद्द करून आता लातूर जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली शिर्डी येथे करण्यात आली.तर त्यांच्या रिक्त --जागेवर परभणीचे जिल्हाधिकारी पी.सीवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु दुसऱ्याच दिवशी पी.शीवा शंकर यांचा नियुक्ती आदेश रद्द करण्यात आला तो कश्यामुळे व कोणाच्या सांगण्यावरून झाला आहे.हे मात्र समजू शकले नाही.एकाकर्तव्यदक्ष अधीका-याची गलीच्छ लोकांना पोसण्यासाठी केलेली फरफटच म्हणावी लागेल.आता नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून लातूर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांच्या नियुक्तीचे आदेश शनिवारी काढण्यात आले.दरम्यान पी. सीवा शंकर हे कर्तव्यदक्ष व वाळु माफियांचे कर्दनकाळ म्हणून समजले जात असल्याने त्यांचा आदेश रद्द केला असावा अशा चर्चेला उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या