💥पुर्णा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा मा.चेअरमन विश्वनाथराव पारवे यांचे दुःखद निधन..!💥विश्वनाथराव पारवे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन, विधितज्ञ ॲड.कैलासराव पारवे यांचे ते चुलते होते💥 

पुर्णा/तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील जेष्ठ नेते तथा संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अत्यंत गौरवशाली नेतृत्व म्हणून परिचीत असणारे व सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहात त्यांनी गौर येथील श्री.सोमेश्वर शिक्षणसंस्था अध्यक्षपदासह नृसिंह सहकारी साखर कारण्याचे संचालक पद तसेच पूर्णा खरेदी विक्री महासंघाचे संचालक चेअरमन पद अशी महत्वाची पदे भुषवली होती विश्वनाथराव मारोतराव पारवे यांचे काल शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ०९-४५ वाजेच्या सुमारास नांदेड येथील खाजगी रुग्नालयात वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.विश्वनाथराव पारवे हे आजारी असल्यामुळे मागील दहा ते बारा दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरु होते.या उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.०८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२-०० वाजता गावाजवळील पूर्वेकडील पूर्णा नांदेड रोडवरील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.विश्वनाथराव पारवे हे ॲड कैलास पारवे यांचे चुलते (काका ) होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या