💥पुर्णा तालुक्यात कॉफी मुक्त अभियानाचा बट्याबोळ ६८ कॉफी बहाद्दर निलंबीत...!💥परभणीचे उपक्षिक्षण अधीकारी संजय ससाणे यांनी केली कार्यवाही💥

पुर्णा/तालुक्यात कॉफी मुक्त अभियानाचा बट्याबोळ झाल्याचे निदर्शनास येत असून आज १२ वी परिक्षा बोर्डाच्या सुरू असलेल्या परिक्षा दरम्यान परभणी जिल्ह्याचे उपक्षिक्षण अधीकारी संजय ससाणे यांनी केलेल्या कार्यवाहीत येथील संस्कृती महाविद्यालयाचे ३८ व तालुक्यातील कावलगाव येथिल जय जवान जय किसान विद्यालयाच्या ३० अश्या एकूण ६८ विद्यार्थ्यांना पकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
        औरंगाबाद शिक्षण मंडळाच्या वतीने सद्ध्या १२ वीच्या कला, विज्ञान,वाणीज्य शाखेची परिक्षा सुरू आहे.शहरातील संस्कृती महाविद्यालयात सोमवारी २४ रोजी भौतीकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान सकाळी ११ वाजता औरंगाबाद शिक्षण मंडळाच्या वतीने नियुक्ती केलेल्या परभणी येथिल उपशिक्षणाधिकारी संजय ससाणे व त्यांच्या पथकाने झाडाझडती घेतली यात त्यांना ३८ विद्यार्थी काॅपी करताना आढळून आले.तर दुपारच्या सत्रात दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कावलगाव येथिल जय जवान जय किसान विद्यालयात या पथकाने छापा टाकला यावेळी राज्यशास्त्र विभागाचा पेपर सुरू होता उपस्थीत सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर ३० विद्यार्थ्याजवळ काॅपी आढळून आल्याने त्या ही विद्यार्थ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
         पुर्णा तालुक्यातील शिक्षणसम्राट व शिक्षणविभागाचे साटेलोटे असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.त्यामुळे मासकाॅपीचे प्रकार सर्रास घडत आहेत.शिक्षणविभागातील बड्या अधीका-यांशी सोयर सुतक व अर्थिक देवाणघेवाण यामुळे १० ,१२ वी परिक्षेदरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होत असते.एवढेच नव्हेतर पुर्णा तालुक्यात परिक्षा केंद्रावर नंबर येण्यासाठी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी येथिल विद्यालयात हजारो रुपयांची वर्गणी जमा करुन आपला प्रवेश घेतात.
गत वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांनी हट्टा झिरो फाटा परिसरातील बाळकृष्ण विद्यालयात मोठी कारवाई करत मासकाॅपी प्रकरण उजेडात आणत ११ जणांविरुद्ध पुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज पुर्णा तालुक्यात एकाच दिवशी ६८ विद्यार्थ्यी काॅपी करताना आढळून आले आहेत.या प्रकारास विद्यार्थ्यां एवढेच धनधागडे संस्थाचालकही जबाबदार आहेत. शिक्षण विभागाचे काही कर्मचारी अधीकारी कर्तव्यदक्ष पणे आपली चोख भुमीका पार पाडत आहेत.परंतू परिक्षा कालावधीत तालुक्यातील महाविद्यालयात सर्रास घडणाऱ्या काॅपी प्रकरणात दोषी असलेल्या संस्था व त्यांचे संस्थाचालक मात्र या कार्यवाहीतून वगळले जात असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या विरुद्ध कर्तव्यदक्ष मुख्याधीकारी पृथ्वीराज हे आता काय कार्यवाही करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या