💥पुर्णेत सार्वजनिक 'शिवजन्मोत्सव' सोहळा अत्यंत धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा...!💥'शिवजन्मोत्सव' मिरवणूकी दरम्यान प्रथमच विविध गणेश मंडळांच्या वतीने सजीव देखावे सादर💥

पूर्णा/महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा हिंदवी स्वराज्याचे  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी पूर्णा शहरात मोठ्या अत्यंत धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर (कदम गल्ली) येथील महादेव मंदिर देवस्थान येथून  सार्वजनिक 'शिवजन्मोत्सव' मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शहरातील विविध मान्यवरांसह प्रतिष्ठित नागरीक व्यापारी,सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी तसेच सर्वधर्मिय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पारंपारिक वाद्य टाळ मृदंग ढोल ताशांच्या गजरात आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयघोषात मिरवणुक मार्गस्थ झाली.यावेळी प्रथमच मिरवणुकीत शहरातील विविध गणेश मंडळांनी शिवरायांच्या जीवनावरील सजीव देखावे सादर करुन शहरात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण केले होते तर शहरातील प्रत्येक शहरवासीय माता-भगिनींनी आपआपल्या घरांसमोर सडा-रांगोळी टाकून आपल्या आराध्य दैवताच्या जन्मोत्सव मिरवणूकीचे स्वागत केल्याचे आज सर्वत्र दिसून आले.यावेळी भव्य 'शिवजन्मोत्सव सोहळा' मिरवणूकीत मुलींनी कुंग-फू कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे या वेळी सर्वधर्मिय शिवभक्तांच्या वतीने पूजन करण्यात आले.
शहरातील विविध चौक परिसरातून वाजतगाजत निघालेल्या 'शिवजन्मोत्सव सोहळा' मिरवणूकीची परत छत्रपती शिवाजी चौक येथे सांगता झाली भव्य सार्वजनिक शिवजन्मोत्सव मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष उत्तम उर्फ बंडू कदम,अध्यक्ष परशुराम उर्फ बाळू जोगदंड,उपाध्यक्ष त्र्यंबक कदम,सचिव विशाल व्यंकटराव कदम,भागवत कदम,संतोष बंडूनाना सातपूते,विष्णू कदम यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शहरासह ग्रामीण भागातूनही सर्वधर्मिय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या