💥पुर्णेतील बळीराजा साखर कारखाना परिसरात ३२ वर्षीय युवकाची तिष्ण शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या...!


💥पोलीस दफ्तरी शेतातील जुन्या भांडणावरुन हत्या केल्याची नोंद💥

पुर्णा/येथील बळीराजा साखर कारखाना परिसरातील कानखेड शिवारातील रस्त्याच्या जवळील असलेल्या शेतात एका ३२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना दि.२५ फेब्रुवारी रोजी  रात्री १२-३० वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या दुर्दैवी घटने मुळे पुर्णा तालुक्यात कायदा व सुव्यस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
------------------------------------------------------------
मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत मयत लक्ष्मण माणिकराव नवघरे याच्या हत्येचे कारण शेतातील जुने भांडणाचा वाद दिले असले तरीही या हत्येचे मुळ कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून हत्येचे नेमके कारण अवैध रेती उत्खनन किंवा अवैध रेती तस्करीतून निर्माण झालेला वाद तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून सखोल चौकशी अंती पोलीस तपासातून हत्येचे मुळ कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------------------------------------------------------------
सविस्तर वृत्त असे की  मयत ३२ वर्षीय युवक लक्ष्मण माणिकराव नवघरे हा तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असून या घटने संदर्भात मयताचे वडील माणिकराव सखाराम नवघरे वय वर्षे ६८ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमुद केले आहे की याच गावातील रहिवासी असलेला आरोपी अनंता दत्तराव नवघरे याने मैत्री करुन काल सोमवार दि.२४ फेब्रुवारी २०२० रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून कान्हेगाव येथून पुर्णा शहरात आणून शेतीतील जुने भांडणाच्या कारणावरून बळीराजा साखर कारखाना परिसरातील कानखेड शिवारातील रस्त्याच्या जवळील शेतात नेऊन मुलगा मयत लक्ष्मण नवघरे याच्यावर तिष्ण खंजीराने तोंडावर गळ्यावर पोटावर छातीवर वार करुन खोलवर जख्मा करुन त्याची हत्या केली त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलीस स्थानकात आरोपी अनंता दत्तराव नवघरे याच्यावर गुरनं.८५/२०२ कलम ३०२ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो.नि.गोवर्धन भुमे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या