💥पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आणखी एका दहशतवादी शैतानाला अटक...!



💥शाकिर बशीर मगरे असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे💥

पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली आहे. शाकिर बशीर मगरे (२२) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयए हे मोठे यश मिळाले आहे. शाकिरला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने १५ दिवसांची कोठडी ठोठावली आहे.

पुलवामा हल्ला हा  फेब्रुवारी २०१९ मध्ये घडवून आणण्यात आला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. आयईडी स्फोटात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा तपास एनआयए संस्था करत आहे.
पुलवामा हल्ल्यात हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा शाकिर बशीर मगरे सदस्य आहे. शाकिर हा पुलवामातील काकापोरा येथील हाजीबालचा राहाणारा आहे. फर्निचर शॉपचा मालक असलेल्या शाकिरने पुलवामा हल्ल्यातील 'सुसाइड बॉम्बर' आदिल अहमद दार याला आपल्या घरात आश्रय दिला होता. तसेच आयईडी बनवण्यातही मदत केली होती, अशी माहिती तपास करताना पुढे आली आहे.

एनआयएने याबाबत सांगितले, शाकिरचा पुलवामा हल्ल्यात स्पष्ट सहभाग होता. हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमद दारला सर्वप्रकारची मदत शाकिरने केल्याचे पुढे आले आहे.एनआयए तपासात आदिल आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूख या दोघांना पुलवामा हल्ल्याच्या आधी २०१८ पासून आपल्या घरात आश्रय दिल्याची कबुली शाकिरने दिली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या