💥हिंगोली जिल्ह्यात अवैध गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापे..!



💥गुटखा तस्करांच्या विरोधात 'मोका' अंतर्गत कारवाई ? उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल काय ?💥 


हिंगोली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या विक्रीस आणलेल्या गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापे मारून दोन गुन्हे दाखल केले.बाराशिव, करंजाळा यात्रेमध्ये १२ पेâब्रुवारीला महाराष्ट्र राज्य निर्मिती, साठा, विक्री व वितरण करण्यास मनाई केलेला तंबाखू गोवा १०००, प्रीमियम राजनिवास पानमसाला, सितार मावा, वजीर जाफरानी जर्दा, व्ही टोबॅको अशा एवूâण २१२ गुटख्याचे पॉकेट २२ हजार ५७७ रूपयाचा माल स्वत:च्या ताब्यात बाळगून चोरटी विक्री करीत असताना मिळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून १४ पेâब्रुवारीला शेख अलीम शेख सलीम, नागनाथ रंगराव शिंदे रा.जवळा बाजार, शेख पेâरोज शेख अफसर रा.भोगाव जि.परभणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचप्रमाणे १३ पेâब्रुवारीला पुष्पक नगर खटकाळी बायपासवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्यावर छापा मारला. ज्यामध्ये ३४९१५ रूपयाचा राजनिवास, सुंगधी पानमसाला, विमल पानमसाला, जाफरानी जर्दा, सुंगधी तंबाखूयुक्त आदी गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात आकाश उर्पâ सागर वुंâडलिकराव नागरे रा.हिंगोली याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कामगिरीत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकुर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांनी सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या