💥परभणी जिल्ह्याचे इमानदार व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर यांची अखेर बदली...!


💥भ्रष्ट राजकारणी आणी रेती तस्करांमध्ये उत्साहाचे वातावरण तर सर्वसामान्य जनतेत नैराष्य💥

परभणी/जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व इमानदार जिल्हाधिकारी श्री.पि.शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे.
परभणीत जिल्हाधिकारी पदावर कार्यरत राहून त्यांनी प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांना शिस्त लावली होती अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या मनावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता जिल्ह्यातील अवैध गौण-खनीज उत्खनन व अवैध रेती तस्करीला अंकूश लावण्यासाठी जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती तत्वभ्रष्ट राजकारणी आणी अवैध रेती तस्करांच्या विरोधात त्यांनी अनेकदा कठोर पावले उचलल्यामुळे त्यांच्या बदलीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कमी झालेली अवैध गौणा-खनीज रेती तस्करी पुन्हा जोमाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या झालेल्या बदली मुळे जिल्ह्यातील गौण-खनीज तस्कर तसेच तत्वभ्रष्ट राजकारण्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या