💥पुर्णा तालुक्यात लहान बालकांचे अपहरण करणारी टोळी घुसल्याचे संकेत ? 💥३ वर्षीय बालीकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला,अपहरणाच्या प्रयत्नात असलेली महिला अटक💥

पूर्णा/तालुक्यात लहान बालकांचे अपहरण करणारी टोळी घुसल्याचे संकेत प्राप्त होत असून असाच गंभीर प्रकार आज शनिवार दि.०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका ३ वर्षीय मुलीचे अपहरण करुन घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला स्थानिक नागरीकांनी पकडून पुर्णा पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले असून सदरील आरोपी महिलेच्या ताब्यातून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.या घडलेल्या घटने मुळे शहरासह तालुक्यातील पालक वर्गात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील व्यंकटी प्लॉट परिसरात घडलेल्या या घटने संदर्भात संजय सुरेशलाल चावरीया यांनी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दिली आहे.व्यंकटी प्लॉट परिसरात राहणाऱ्या संजय चावरीया यांच्या ३ वर्षीय मुलीचे एका ३५ वर्षीय महिलेने अपहरण केले. मुलीला घेऊन जात असतांना राजेश चावरीया,सुरेशलाल चावरीया,ज्योती चावरीया,अजय चावरीया आणि इतर एकाने सदर महिलेला पकडले. यावेळी तिच्याजवळ तीन वर्षीय मुलगी होती. महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर तीने सुमित्रा (गांधरी) चपा बावरी, रा. पुरोलीया ठाणा उचीपाडा साहेब बांध पश्चिम बंगाल असे नाव सांगितले. महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.गोवर्धन भुमे यांच्या मार्गतदर्शनाखाली सपोनि.धुमाळ करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या