💥उडु उडु गेल सगळ गाव अन् समद्याच्या मागन बाईला लागल पाहा रावसाहेबाच नाव.....!💥जवानीच्या जल्लोशात मानसाने केलेल्या पापात कुटुंबाची मात्र हाल अपेष्ठाच होती राव....😢
-----------------------
' उडु उडु गेल सगळ गाव अन् समद्याच्या मागन बाईला लागल पाहा रावसाहेबाच नाव 'अशी अवस्था व्हायच्या अगोदर रावसाहेबाला जिवलग मित्रांनी लई समजावल पण रावसाहेब ऐकता ऐकना मित्रायला म्हणतो कसा अर..गप बसारे भाड्यांनो गावचा पोलीस पाटील हाय मी...रावसाहेबान शेवटी ऐकलच नाय मित्रायच.. बाजारु बाईच्या नादाला लागून घरच्या माय-माऊलीला लेकरा बाळायला सोडून लई मज्जा करायचा त्या नंदीग्राम गावच्या पुंजाबाई संगती जमीन जायजाद समद फुकल..जवळ पैसा होता तवर रावसाहेबाला पुंजाबाईचा सारखा फोन चालूच पाटील याकी तुमच्या बिना करमतच नाय बगा..लगीच रावसाहेब निघालाच नंदीग्रामाला.. शेवटी रावसाहेबा जवळचा पैसा संपला अन् पुंजाबाईचा फोन यायचा बंद..'रावसाहेब बर्बाद अन् वक्टी पुंजाबाई आबाद'..पाहाता पाहाता गावचा पोलीस पाटील रावसाहेब समद्या गावासाठी रावश्या झाला...आता रावसाहेब गावात गुरढोर हाकतोया अन् गावची टवाळखोर पोर त्याला बघून जोरजोरात ' कोण होतास तु काय झालास तू अर वेड्या कसा वाया गेलास तू'....हे गाण जोरजोरात म्हणून रावश्याला चिडवतात अन् रावसाहेब दगड घेऊन पोरांच्या माग पळतांना पाहून गावातील समदे लोक खदाखदा हसतात म्हणतात ना...जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव....एवढ मात्र निश्चितच जवानीच्या जल्लोशात मानसाने केलेल्या पापात निरपराध कुटुंबाची मात्र हाल अपेष्ठाच होती राव....😢

काल्पनिक लघुबोधकथा - लेखक - चौधरी दिनेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या