💥नांदेड-अमृतसर-कर्तारपूर साहीब येथील ऐतिहासिक तिर्थस्थळांचे दर्शन घेऊन परतलेल्या श्रध्दाळूंचा सत्कार..!💥पुर्णा रेल्वे स्थानकावर शहीद उधमसिंघ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले जल्लोशात सत्कार💥

परभणी/नांदेड येथील सचंखंड हुजूर साहीब ते अकाल तखत साहीब अमृतसर येथे दर्शन करुन सुरसिंघ जिल्हा अमृतसर येथे श्रीमान सचखंडवासी संत बाबा दयासिंघजी यांची ६ वी बर्सी (पुण्यतिथी) साजरी करुण्यासाठी नांदेड येथून दि.१६ जानेवारी २०२० रोजी रवाना झालेले शंभर ते दिडसे सिख श्रध्दावान तिर्थयात्रींनी दि.१८ जानेवारी २०२० रोजी अमृतसर येथील हरमंदीर साहीब अकाल तखत साहीबसह येथील ऐतिहासिक गुरुद्वारांचे दर्शन घेऊन दि.१९ जानेवारी रोजी श्रीमान सचखंडवासी संत बाबा दयासिंघजी यांच्या ६ व्या बर्सी (पुण्यतिथी) निमित्त सुरसिंघ जिल्हा अमृतसर येथील पुण्यतिथी कार्यक्रमास अत्यंत भक्तीभावे हजेरी लावून २० जानेवारी २०२० रोजी पाकीस्तान येथील कर्तारपूर साहीब गुरूद्वाऱ्याचे दर्शन घेतले या धार्मिक तिर्थयात्रेत सहभागी दर्शनार्थी जत्था समुहातील श्रध्दाळू काल शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२० रोजी अमृतसर-हुजूर साहीब नांदेड सचखंड एक्सप्रेस ने परतीचा प्रवास करीत असतांना
परभणी जिल्ह्यातील पुर्णा रेल्वे स्थानकावर शहिद उधमसिंघ फाउंडेशन अजीतन्युज हेडलाईन्स परिवार तसेच युवक नेता विद्यानंद तेजबंद मित्र परिवाराच्या वतीने  पत्रकार दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जत्थ्यातील   अकाल तखत साहीब अमृतसर में सचखंडवासी श्रीमान तिर्थयात्री नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड सदस्य सरदार भाई जसपालसिंघ लांगरी,सरदार बलजीतसिंघजी बावरी,सरदार महेपालसिंघजी लिखारी,सरदार सोनुसिंघजी मोगलीवाले,सरदार सतनामसिंघजी मनी,सरदार सेवकसिंघजी लेहंग,सरदार राजासिंघजी खालसा आदी सन्माननीय मान्यवरांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला यावेळी मित्र परिवाराच्या वतीने चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती या सत्कार सोहळ्या वेळी युवा नेता विद्यानंद तेजबंद,वैभव उर्फ बाळूभैया कुऱ्हे,दिनेशभाऊ सोनकांबळे,अजीत चौधरी,गोविंद तेजबंद,उमाकांत सोळंके,पप्पू रोडगे,अमरसिंह ठाकूर आदींसह असंख्य मित्र मंडळु उपस्थित होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या