💥पालमला उद्या ११ जानेवारी रोजी नुतन न्यायालयाच्या इमारतीचा बांधकाम भूमिपूजन उद्घाटन सोहळा..!


   
💥उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती आर.जी.अवचट यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन💥         

 पालम :-(प्रतिनिधी )पालम येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी या नूतन न्यायालयीन इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी उद्घाटन सोहळा पालम  जयकवाडी वसाहत येथे श्री न्यायमूर्ती आर जी अवचट उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या शुभहस्ते उद्घाटन व एच एस महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी ठिक अकरा वाजता संपन्न होत आहे हा कार्यक्रम सोहळा जयकवाडी वसाहत हनुमान मंदिर जवळ पेठ पिंपळगाव रोड येथे पार पडणार आहे असे वकील संघ अध्यक्ष एडवोकेट व्हि डी जाधव व एस एन पाटील दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पालम  यांनी कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या