💥अजीत न्युज हेडलाईन्स कार्यालयात नगर परिषदेतील नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार...!💥नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत कर्तव्यदक्ष सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांना निरोप समारंभ संपन्न💥

पुर्णा/येथील नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड घोषित करण्यात आली असून नगर परिषदेच्या शिक्षण सभापती पदावर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष विशाल कदम तर आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदावर ॲड.हर्षवर्धन गायकवाड,पाणी पुरवठा सभापती पदावर ॲड.राजेश भालेराव यांची निवड झाल्याने तिन्ही मान्यवरांच्या सत्कारासह पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तव्यदक्ष सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभासह कृतज्ञतापूर्ण सत्काराचे आयोजन आज मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी सायं.०७-०० वाजेच्या सुमारास येथील अजीतन्युज हेडलाईन्स कार्यालयात  करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी गजानन हिवरे,राज नारायनकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,लक्ष्मीकांत शिंदे,युवासेना शहर संघटक विद्यानंद तेजबंद,सुनील कदम,दिनेश सोनकांबळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगर परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण सभापती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,आरोग्य व स्वच्छता सभापती ॲड.हर्षवर्धन गायकवाड,पाणी पुरवठा सभापती ॲड.राजेश भालेराव यांचा संयोजक तथा अजीत न्युज हेडलाईन्सचे संपादक दिनेश चौधरी यांच्या तर्फे शाल पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर तिन्ही मान्यवर नवनिर्वाचित सभापतीच्या उपस्थितीत नुकतीच बदली झालेले पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तव्यदक्ष सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करुन त्यांचा कृतज्ञतापुर्ण सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्या करीता प्रा.गंगाधर खाकरे,अंगद मोरे,कोंडीबा कदम,गोविंद तेजबंद,अजीत चौधरी,पप्पू रोडगे,श्रीनिवास तेजबंद,विकास कळसे,बालाजी कदम,जय चंदन,आकाश कदम,आदिनाथ कदम,अक्षय कदम आदींनी विशेष परिश्रम केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या