💥महिन्यात एखाद दुसरी कारवाई करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार💥
पुर्णा/तालुक्यातील बेलगाम झालेल्या अवैध रेती तस्करीला लगाम लावण्यात महसुल प्रशासनाला संपूर्णपणे अपयश आल्याचे दिसत असून तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी पुर्णा नदीपात्रातील तराफे जाळण्याच्या कारवायांसह अवैध रेतीसाठा जप्तीच्या कारवाया केल्यानंतर हीं पुर्णा-कान्हेगाव-माटेगाव-कौडगाव-सुकी परिसरात तराफ्यांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करीत मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होतांना पाहावयास मिळत असून
पुर्णा तालुक्यातील एकाही रेती घाटाचा महसुल प्रशासनाने अधिकृत लिलाव केला नसतांना तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासकामांसह खाजगी बांधकामांना रेती पुरवठा होतो तरी कुठून ? या प्रश्नाचे उत्तर एकमेव असे की तालुक्यात महसुल प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी आणी कर्मचारी आणी अवैध रेती तस्करांतील आर्थिक हितसंबंधच अवैध रेती तस्करीला कारणीभूत ठरत आहे.कान्हेगाव परिसरातील जुन्या रेती स्थळावर अवैध रेती तस्करांनी बेकायदेशीर रित्या रेती धक्का तयार केल्याचे निदर्शनास येत असून
या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करुन अनेक टिप्पर व ट्रेक्टर द्वारे रेती तस्करी केली जात असून माटेगाव-कौडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात जागोजागी अवैध रेतीसाठे निदर्शनास येत आहेत.महसुल प्रशासनातील अधिकारी महिन्यात एखाद दुसरी कारवाई केल्याचे नाट्य रंगवत महसुल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डोळ्यात अक्षरशः धुळ झोकण्याचा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास येत असून महसुल विभागाने दि.२१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५-००वाजेच्या सुमारास भरदिवसा अवैध गौण-खनीजाची तस्करी करीत असल्याचे कारणावरून एमएच १४ बीजे ०००२ या क्रमांकाचे वाहन अली नगर भागातील रेल्वे पुलाखालून मुरुम घेऊन जात असतांना पकडले तसे बघितल्या रेल्वे लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामांवरील पुलांच्या तसेच पुर्णा-नांदेड रोडवरील हिंगोली गेट या ठिकाणी बांधकाम होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी मागील अनेक दिवसांपासून दिवसभरात असंख्य वाहणांतून बेकायदेशीर रित्या अवैध मुरुमाची वाहतूक होत असतांना या एकाच टिप्परवर कारवाई करणे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचाच प्रकार म्हणावा लागेल सदरील टिप्परला नायब तहसिलदार चंद्रकांत बिजमवार यांनी दिलेल्या माहिती नुसार १,१०,०००/-रुपये दंड ठोठावल्याचे समजते सदरील प्रकारही केवळ कारवाई नाट्यच असल्याचे बोलले जात असून तालुक्यात अवैध गौण-खनीज तस्करीला लगाम लावण्याचे नाट्य रंगवून महसुल प्रशासन एकप्रकारे जनसामान्यांची मस्करीच करीत असल्याचे दिसत आहे...
0 टिप्पण्या