💥पुर्णेतील न्यु आदर्श कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरात धाडसी चोरी..!



💥डिवायएसपी कर्डीलेंच्या घरासमोरील घराचे कुलूप कोंडे तोडून पळवला १,३५०००/-रुपयांचा मुद्देमाल💥

पूर्णा/ येथील विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांचे निवासस्थान असलेल्या न्यु आदर्श कॉलनी परिसरातील अगदी त्यांच्या निवासस्थाना समोर असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडण्याचे धाडस दाखवत तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांना सलामी दिल्याचा गंभीर प्रकार शहरात घडल्याचे समोर आले आहे.



      एकदंर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अवैध व्यवसायांसह मारहाण गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात होणारी अवैध रेती तस्करी या गंभीर प्रकारांकडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांचा सातत्याने कानाडोळा होत असतांनाच आता चोरट्यांनीही पुन्हा त्यांना आव्हान देत त्यांच्या अगदी घरासमोर घर असलेले सेवानिवृत्त प्रा. रामचंद्र भुसारे यांचे घर शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी ते  बाहेरगावी गेले असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप व चार कपाट फोडून १ लाख ३५ हजार रुपयांचे दागीने तसेच नगदी रक्कम पळवून नेली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे घर समोरासमोर असतांनाही चोरट्यानी घराची कुलूप-कड्या तोडून प्रा.भुसारे यांच्या घरात प्रवेश करून चार कपाट फोडून व घरातील सर्व सामान तपासून अगदी बिनधास्तपणे चोरी केली.घरातील खाद्यपदार्थावर ही मनमोकळेपणाने ताव मारला दरम्यान श्वानपथकास व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.पण श्वानपथक माग काढू शकले नाही.डिवायएसपी कर्डीलेच्या घरासमोर चोरी झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
          आज शनिवार दि.२५ जानेवारी रोजी सकाळी ज्ञानेश्वर भुसारे गावावरुन परतल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले.त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास फौजदार चंद्रकांत पवार,अर्जून रणखांब ,सय्यद मोइन करीत आहेत. प्रा. भुसारे यांच्या  घरा समोरच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले हे  राहतात. त्यांच्या दारातच चोरी झाल्याने त्यांची गुन्हेगारांवर वचक नसल्याचे दिसून येते. त्यांनाच चोरट्यांनी जणूकाही आव्हान देत चोरी केल्याची घटना घडली.या धाडशी चोरीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात  गुन्हेगारांवर श्री.कर्डीले हे स्वतःचा यत्किंचितही वचक निर्माण करू शकले नाहीत ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणाली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या