💥परभणीतील राज्यस्तरीय रग्बीस्पर्धेत मुलींतुन सातारा तर मुलांमध्ये ठाणे प्रथम...! 💥प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते💥

परभणी/ रग्बी असोसिएशन  ऑफ महाराष्ट्र संलग्नीत  रुग्बी असोसिएशन परभणी जिल्ह्याच्या वतीने परभणी राज्यअजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ( दी. 27 ते 28) जानेवारी 2020  येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल स्टेशन रोड परभणी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये  मुलींच्या सातारा संघाने  तर मुलांच्या ठाणे संघाने  प्रथम क्रमांक पटकावला . पारितोषिक वितरण कार्यक्रमास  शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, बेलेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष सुशील देशमुख,  कृषी अधिकारी शंकर बलसेटवर , प्राचार्य मधुकर जोंधळे, क्रीड़ा अधिकारी चव्हाण ,सरपंच अभय कुंडगीर , प्रफुल पैठणे , मुख्याध्यापक  प्रकाश हरगावकर, गोपाळ मोरे ,सुशील देशमुख , प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गिरी , विकास चौरसिया  रमेश शिंदे ,नारायण बनसोडे  ,शंकर शहाणे , आयोजन सचिव शिवाजी खुणे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातुन मुलांचे 22 तर मुलींचे 21 संघ परभणीत दाखल दाखल झाले होते. त्यांची निवास व भोजनाचा व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती .दोन दिवस घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्य स्पर्धांमधून महाराष्ट्राचे मुला-मुलींचे रग्बी स्पर्धांमधून  मुलींच्या संघात प्रथम सातारा, द्वितीय मुंबई तर तृतीय भंडारा संघाने पारितोषिक पटकावले. मुलांमध्ये प्रथम ठाणे, द्वितीय कोल्हापुर, तृतीय सातारा संघाने पारितोषिक पटकावले.भंडारा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.  स्पर्धा यशस्वीते योगेश आदमी ,रवी मुंडे ,गजानन पिसाळ ,अजय भवर ,बाळू सानप ,अशिष परदेशी ,प्रवीण देशपांडे ,निखील पुणे ,विजय पांढरे ,ऋषिकेश ,अजय, हनुमान, अभिजीत ,गीता, भांड, मयुरी, सुकेशनी ,डॉ.मंगेश कोमटवार अदिनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या