💥पुर्णेतील वाईन शॉप चालक 'एकदिवसीय परवाना' न देता मनमानी दराने बेकायदा करतोय दारु विक्री...!💥पोलीस प्रशासनाने दिली वाईन शॉप चालकाला खुली सुट,ग्राहकावर मात्र केला गुन्हा दाखल💥

पुर्णा/शहरातील पोलीस स्थानकाच्या अवघ्या पन्नास मिटर अंतरावर असलेल्या में जयस्वाल वाईन शॉप या देशी-विदेशी दारु विक्रेत्याच्या मनमानी व बेकायदेशीर दारु विक्रीचा फटका आता ग्राहकांना बसत असून वेळी अवेळी दारु दुकान उघडने मनमानी दराने कलम ७० सी या नियमाचे उल्लंघन करीत एकदिवसीय परवान्या शिवाय देशी-विदेशी दारुची विक्री करणे असा गैरकारभार चालवला असून याचा नाहक फटका दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२-४० वाजेच्या सुमारास एका ग्राहकास सोसावा लागला यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधित ग्राहकावर गुन्हा दाखल करण्याचे धाडस तर केले परंतु में जयस्वाल वाईन शॉप या देशी-विदेशी दारु दुकानदारास मात्र सोईस्कररित्या या गुन्ह्यातून वगळण्याचा प्रकार मात्र समोर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील पोलीस स्थानकाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर डॉ.आंबेडकर रोड दयानंद चौक परिसरात में जयस्वाल वाईन शॉप देशी-विदेशी दारुचे दुकान असून संबंधित वाईन शॉप चालक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन करीत मागील अनेक दिवसांपासून मनमानी कारभार चालवत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक तर करीतच आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाने राज्यात देशी-विदेशी दारु विकत घेणे,बाळगणे,वाहतूक करणे वैयक्तिक सेवन व वापरासाठी प्रत्येक ग्राहकांना दारु खरेदी करतेवेळी देण्यात येणारा 'एक दिवसीय परवाना' न देता दारु विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत असून दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी बलसा ता.पुर्णा येथील नामदेव मारोतराव डुबे हे वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे में जयस्वाल वाईन शॉप चालक रवी रतनलाल जैस्वाल यांच्या दुकानावार दारु घेण्यास गेले यावेळी त्यांनी रॉयल स्टेग या कंपनीचे ७५०एमएलचा एक खंबा आणि १८० एमएलच्या तिन कॉटर खरेदी केल्या यावेळी नियमानुसार दारु दुकानदार जयस्वाल यांनी त्यांना 'एक दिवसीय परवाना' देणे आवश्यक होते परंतु जयस्वाल यांनी त्या ग्राहकास परवाना न देता दारु विक्री केली नेमके याच वेळी पोलीसांनी त्याला धरले व त्याच्यावर गुरनं.४३४/१९ कलम ६५ (इ) मुप्रोका प्रमाणे गुन्हा दाखल केला परंतु एक दिवसीय परवाना न देता बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दुकानदार जयस्वाल याच्यावर मात्र गुन्हा न दाखल करता त्याला सोईस्करपणे सुट दिल्याचे निदर्शनास येत असून संबंधित दारु ग्राहक ज्याच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला त्या नामदेव डुबे यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी दारु दुकानदार जयस्वाल याने एक दिवसीय परवाना दिल्याचे समजते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या