💥पुर्णा तालुक्यातील महसुल प्रशासनाच्या निर्लज्ज कारभारा मुळे रेती माफीया निर्ढावले...!


💥कान्हेगाव-माटेगाव-कौडगाव-सुकी परिसरात रेती तस्करांची दहशत,अवैध रेती वाहतुकी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान💥

पुर्णा/तालुक्यातील तहसिलदार व महसुल प्रशासनाचा कारभार 'आम्ही मारल्या सारखे करतो तुम्ही रडल्या सारखे करा' अश्या पध्दतीने चालत असून रेती तस्कर आणी महसुल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी आणी कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून कान्हेगाव-माटेगाव-कौडगाव-कानखेड-सुकी पिपळगाव आदी गावातील पुर्णा-गोदावरी नदी पात्रात शेकडो ताफ्यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध चोरट्या रेतीचे उत्खनन करण्यात येत असून असंख्य वाहनांसह शेकडो गाढवांच्या साहाय्याने या चोरट्या रेतीची तस्करी केल्या जात असल्यामुळे परिसरातील नागरीक तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतांना पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील कान्हेगाव,माटेगाव,कौडगाव,कानखेड परिसरातून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात शेकडो ताफ्यांच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करुन असंख्य वाहनांसह शेकडो गाढवांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी तस्करी करीत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाईपलाईन फुटून नुकसान होत असून अवैध रेती वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेली गाढव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून गहु,ज्वारी,हरबरा,तुर आदी उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत परंतु रेती तस्करांच्या दहशती पुढे शेतकरी हवालदील झाल्याचे व रेती तस्करांकडून मिळणाऱ्या गांधी प्रेमापुढे महसुल प्रशासन ही कारवाई नाट्य सादर करीत जिल्हा महसुल प्रशासन व जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा अत्यंत निर्लज्ज प्रकार करतांना पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदी पात्रात शेकडो ताफ्यांसह शासकीय मालमत्ता असलेल्या गौण-खनीज रेतीवर अक्षरशः भर दिवसा दरोडा टाकणाऱ्या असंख्य रेती तस्करांच्या टोळ्या कार्यरत झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरीकांचे जनजिवण धोक्यात आले असून रेती तस्करांना विरोध करणाऱ्या परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना मारहाणीचे गंभीर प्रकारही होतांना पाहावयास मिळत आहे.

अवैध रेती तस्करीत अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही उतरल्याने परिसरात केव्हा रेती तस्करांच्या टोळ्यामध्ये टोळीयुध्द होण्याचीही शक्यता वर्तवली जात असून अशे झाल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी महसुल प्रशासन व अवैध रेती तस्करीकडे बघून न बघितल्या सारखे करणारे पोलीस प्रशासनच जवाबदार राहील.कारण यापुर्वी सुध्दा महसुल प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच दस्तूरखुद्द पुर्व तहसिलदार मदनुरकर व विद्यमान तहसिलदार पल्लवी टेमकर यांना सुध्दा रेती तस्करांच्या दहशतीला तोंड द्यावे लागलेले आहे.तालुक्यातील रेती तस्करीला खऱ्या अर्थाने आळा जर घालायचाच असेल तर जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी अवैध रेती उत्खनन व अवैध रेती तस्करी होत असलेल्या परिसरातील सरपंच-उपसरपंच-ग्रामसेवक-तलाठी-मंडल अधिकारी यांना सर्वस्वी जवाबदार धरुन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणे जरुरी असल्याचे मत जानकारांतून व्यक्त होतांना दिसत आहे....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या