💥पुर्णा तालुक्यातील मौजे पिंपळगाव लिखा परीसरात अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांचा बोगस सर्वे..?



💥तलाठी रामेश्वर केंद्रे यांच्यावर कारवाई करण्याची गजुभाई मित्र मंडळाची तहसीलदारांकडे कडे मागणी💥

पुर्णा/तालुक्यातील महसूल प्रशासनाचा कारभार संपूर्णपणे डासळला असून महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह तलाठी मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जनसामान्यांसह शेतकरी शेतमजूरांची वेळोवेळी अडवणूक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे मौजे पिंपळगाव लिखा परीसरात अतिवृष्टी मुळे कमी अधिक प्रमाणात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे परंतु अतिवृष्टीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांना वगळून ज्या बागायतदार शेतकऱ्यांचे कुठलेच नुकसान झाले नाही अश्या धनदांडग्या बागायतदार शेतकऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत  त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा खोटा अहवाल सादर करून धनगर टाकळी सज्जाचे तलाठी रामेश्वर केंद्रे यांनी अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांवर आन्याय केल्याचा गंभीर आरोप गजुभाई मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष ज्ञानोबा किरगे यांनी केला असून संबंधित तलाठ्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लेखी स्वरुपात स्वाक्षरीनिशी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे केली आहे या संदर्भात तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी मंडल अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर सखोल चौकशी करुन तलाठी केंद्रे दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिशा निर्देशा प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या