💥पुर्णेत लायन्स क्लबतर्फे मुकबधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप....!💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधारचे डॉ.गुलाबराव हिंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विनय वाघमारे यांची उपस्थिती💥                         

 पूर्णा / प्रतिनिधी लायन्स क्लब पूर्णा शाखेच्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित साधुन शहरातील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्याची आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार हाॕस्पिटलचे डाॕ.गुलाबराव हिंगोले हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॕ.विनय वाघमारे यांनी दिव्यांग व मुकबधिर विद्यार्थ्यांना सांभाळने,शिकवने अवघड असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमाला डाॕ.अजय ठाकुर,डाॕ.शिरिष पारवे,अमृत कदम,संजय लोहिया,प्रमोद मुथा,संजय भाकरे उपस्थित होते.तर मुख्याध्यापक सिध्देश्वर कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास अनिल क्षिरसागर,विमल पाटील,माधव नागठाणे,नईम कुरेशी,विमलबाई दवणे,शिवाजी कदम,लक्षमण म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.आभार जेष्ट शिक्षक विजय बगाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी,शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या