💥नांदेड मनपात प्रजासत्ताक दिनी प्रतिकात्मक राष्ट्रध्वजाचा पायदळी तुडवून अवमान..!


💥राष्ट्रध्वज तिरंगा असलेल्या रागोळीला रथी महारथींनी अक्षरशः पायदळी तुडवले,गुन्हा दाखल करण्याची मागणी💥

नांदेड/येथील नांदेड वाघाळा महानगर पालीका प्रांगणात प्रजासत्ताक दिन रविवार दि.२६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून मनपा प्रशासनाने तिरंगा ध्वज दर्शविणारी रांगोळी काढून त्यावर वंदे मातरम व जय हिंद असे लिहिले होते
यावेळी प्रजासत्ताक दिना निमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यास उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त अरुण डोंगरे,माजी मंत्री डि.पी.सावंत,विधान परिषद सदस्य आ.अमर राजुरकर,येवनकर,नगरसेवक विलास धबालेंसह अन्य नगरसेवक नगरसेविका तसेच प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींना फोटोसेशन करतेवेळी याचेही भान राहिले नाही की आपण राष्ट्रध्वजा समोर फोटो काडत असतांना ध्वजासमोर रांगोळीने काढलेला प्रतिकात्मक राष्ट्रध्वज अक्षरशः पायातील पादत्राणांसह तुडवून राष्ट्रध्वजाचा अवमान करीत आहोत यावेळी उपस्थित काहींनी सदरील घटनेचे चित्रीकरण केल्याने हीं गंभीर बाब निदर्शनास आली असून या दुर्दैवी घटने विरोधात
जागृत नागरिक सरदार जसबीरसिंघ बुंगई,सरदार मनिंदरसिंघ रामगडीया,सरदार जगदीपसिंघ नंबरदार यांनी पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी स्वरुपात आपल्या स्वाक्षरीनिशी रितसर तक्रार देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या