💥परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव टोळीयुध्दाला कारण ठरण्याची शक्यता...?💥कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण उपाध्याय यांनी लक्ष देण्याची आवश्यकता💥

परभणी/जिल्ह्यातील महसुल प्रशासन जिल्ह्यातील वाढत्या अवैध रेती तस्करी विरोधात तर राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्ह्यातील वाढत्या देशी-विदेशी दारु तस्करीसह अवैध देशी-विदेशी दारु विक्री विरोधात तर अन्न व औषधी प्रशासन वाढत्या गुटखा तस्करीसह विक्री विरोधात कठोर कारवाई करण्यास सातत्याने असमर्थ ठरत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या अवैध व्यवसायांत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेपासह गुन्हेगारी प्रवृत्तीचा हीं शिरकाव झाल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती आर्थिक दृष्ट्या प्रबळ होऊन आपआपल्या टोळ्या निर्माण करीत महसुल प्रशासन,राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न व औषधी प्रशासनाला राजकीय दबावतंत्राचा वापर करीत प्रसंगी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर प्रचंड दहशत निर्माण करीत डोळे वटाऱ्याची हिंमत करीत असल्याचे निदर्शनास येत असून या वाढत्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना एसीबी ट्रेप मध्ये अडकवण्याच्या तसेच मारहान करण्याच्या तर तक्रार करणाऱ्या तक्रारदार जनसामान्यांना विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकारांच्या जिवे मारण्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बनावट गुन्हें दाखल करण्याच्या धमक्याही देत असल्याचे निदर्शनास येत आहे.जिल्ह्यात पुर्णा तालुका अवैध रेती तस्करी अवैध देशी-विदेशी दारु तस्करीसह अवैध देशी-विदेशी दारु विक्रीत सर्वात आघाडीवर आघाडीवर असल्याचे निदर्शनास येत असून गुटखा तस्करीला मात्र बऱ्याच प्रमाणात लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे.तालुक्यातील अवैध गुटखा तस्करीला लगाम लावण्याचे संपूर्ण श्रेय पो.नि.सुभाष राठौड आणी कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत राठौड यांना जाते.मागील आठ वर्षापूर्वी संपूर्ण मराठवाड्यात मटका जुगारासह गुटखा तस्करीत आघाडीवर असलेला पुर्णा तालुका पोलीस प्रशासनाच्या सक्रीयते मुळे आता पिछाडीवर असला तरीही अवैध रेती तस्करी व अवैध देशी-विदेशी दारु तस्करीत प्रचंड आघाडी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे असून संपूर्ण मराठवाड्यात अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रातून राजकीय क्षेत्र आणी राजकीय क्षेत्राच्या आधारे आपले अवैध धंद्यांचे मोठे साम्राज्य स्थापण करण्याची कुटीलवृत्ती असलेले पडद्या मागील समाजकंठक सक्रीय झाल्याने शहरातील किरकोळ वादाला जातीय हिंसाचाराचे स्वरुप देऊन सतत शहरासह तालुक्यातील वातावरण तापत ठेवण्याचे प्रकार घडत असून पोलीस प्रशासनावर प्रत्येक घटनेवेळी सातत्याने राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने पोलीस पोलीस प्रशासनही अनेकवेळा हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.पोलीस प्रशासनात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातातील कळसुत्री बाह्यशक्तीचा तसेच राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने पोलीस स्थानकातील प्रत्येक गोपनीय गोष्टींचा गुन्हेगारी प्रवृत्तींकडे उलगडा होतांना पाहावयास मिळत असल्याने जिल्ह्याचे कर्तव्यकठोर व गुन्हेगारी प्रवृत्तीचा कर्दनकाळ ठरत असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण उपाध्याय यांनी जिल्ह्यातील पुर्णा पोलीस स्थानकासह प्रत्येक पोलीस स्थानकांना पोलीस स्थानकाच्या प्रवेश द्वारावर दोन कर्मचाऱ्यांची चौकी बनवून पोलीस स्थानकात येणाऱ्या लोकांची ओळखपत्र/आधारकार्ड क्रमांक व येण्याच्या कारणासह नोंदणी करुन राजकीय हस्तक्षेप तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुखबीर दलालांच्या होणाऱ्या हस्तक्षेपाला लगाम लावण्याचे सक्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी आता जनसामान्यांतून जोर धरू लागली असून सन्माननीय जिल्हा पोलीस अधिक्षक उपाध्याय साहेबांनी शहर परिसर अतिसंवेदनशील असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्यास वेळोवेळी कारणीभूत ठरत असलेली देशी-विदेशी दारुची दुकाने शहराबाहेर हलवण्यासाठीही प्रयत्न करावे कारण या संदर्भात परिसरातील नागरीकांच्या तक्रारी नंतरही जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असून उलट तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच संबंधित गैर तक्रारदार देशी-विदेशी दारु दुकानदारांकडून आपल्या हस्तकांमार्फत खोटे गुन्हें दाखल करण्यासह जिवेमारण्याच्या सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे श्री.उपाध्याय साहेबांनी पुर्णा तालुक्याकडे विषेश लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या