💥श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन....! 💥स्नेह संमेलनाचे उद्घाटन डिवायएसपी श्रीकृष्ण कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले💥

 पुर्णा येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचे उद्घाटन श्री श्रीकृष्ण विश्वनाथ कर्डिले   उपविभागीय पोलिस अधिकारी,पूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी विविध गुणाच्या विकासासाठी स्नेह संमेलनाचे  महत्व विशद केले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांला सर्वगुण संपन्न होण्यासाठी सर्वांगिण विकासाची गरज असते.त्याबरोबर शारिरीक विकास ही तेवढाच आवश्यक असतो यासाठी स्नेह संमेलन व विविध क्रीडा प्रकाराला त्यांनी महत्त्व दिले. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी आयोजिलेल्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी श्री गुरू बुद्धिस्वामी  शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सितारामआप्पा एकलारे सचिव प्रा. श्री.गोविंदरावजी  कदम, सहसचिव श्री अमृतरावजी कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम जेष्ठ संचालक श्री साहेबरावजी  कदम,प्राचार्य डॉ. के. राजकुमार, डॉ. रवि बरडे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी प्रा.शिवदास थगनर,  प्रा. आबाजी खराटे ,  प्रा. सतीश बरकुंटे, प्रा. मंगेश अंबेकर तसेच सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नारायण ढोणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शेजूळ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या