💥पुर्णा शहरातील मुख्य बाजार पेठेसह उच्चभ्रू वसाहतीं मध्ये दारुड्यांचा हैदोस...!



💥दारुड्यांकडून महिलांना अश्लील भाषेचा वापर,नागरिक व्यापाऱ्यांकडून दारुसाठी सक्तीने पैशाची वसूली💥

पुर्णा/शहरासह संपूर्ण तालुका अवैध दारु विक्रेत्यांच्या जाळ्यात अडकल्याचे दिसत असून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध देशी-विदेशी दारु तस्करी व विक्रीचे जाळे पसरवण्याचे काम शहरातील परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांनीच केल्याचे अनेक वेळा उघडकीस आले असतांनाही जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनाने संबंधित परवाना धारक दारु विक्रेत्यांना गुन्ह्यांमधून वगळून बेकायदा दारुची वाहतूक करणारे व किरकोळ स्वरुपात दारु विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दारु पुरवठा करणाऱ्या परवानाधारक दारु विक्रेत्यांची हिंमत वाढल्याचे दिसत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या लोकमान्य टिळकरोड,डॉ.आंबेडकर रोड परिसरात में जयस्वाल वाईन शॉप व वसंतलाल जयस्वाल यांचा देशी दारु अड्डा असून संबंधित देशी-विदेशी दारु दुकाने परिसरातील स्थानिक नागरिक,महिला,व्यापारी व परिसरातून वावरणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थींनींसाठी धोकादायक झाल्याचे दिसत आहे संबंधित देशी-विदेशी दारु दुकाने पोलीस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असतांनाही संबंधित में जयस्वाल वाईन शॉप व वसंतलाल जयस्वाल देशी दारु अड्डा चालक कायद्याची अक्षरशः पायमल्ली करीत परिसरासह ग्रामीण भागातील अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात अवैध दारु पुरवठा खुलेआम करतात कसा ?

असा प्रश्न उपस्थित होत असून में जयस्वाल वाईन शॉप मालक रवी रतनलाल जयस्वाल हे वाईन शॉपवर येणाऱ्या ग्राहकांना छापील दरा पेक्षा जास्त दराने दारु विक्री तर करतच आहे याशिवाय सर्वात मोठी गंभीर बाब म्हणजे देशी-विदेशी दारु खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकदिवसीय परवाना देतांना विदेशी दारु खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही देशी दारु खरेदी नंतर देण्यात येणारा एक दिवसीय परवानाच देत असल्याने संबंधित दारु विक्रेता ग्राहकांसह प्रशासनाचीही दिशाभूल करीत असल्याचे दिसत आहे.संबंधित परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदार परिसरात दिवसभर स्वतःच्या दुकानांद्वारे व रात्री अपरात्री आपल्या हस्तकांद्वारे अवैध देशी-विदेशी दारु विक्री करीत असल्यामुळे परिसरात चोवीस तास दारुड्यांचा धुमाकूल माजत असल्याचे पाहावयास मिळत असल्याने या परिसरातील रहिवासी प्रचंड त्रस्त झाल्याचे दिसत असून परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रितसर लेखी स्वरुपात तक्रार देऊन तब्बल दिड महिण्याचा कालावधी उलटला आहे.परंतु त्यानंतर ही संबंधित दारु विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढल्याचे दिसत असून संबंधित देशी-विदेशी दारु विक्रेते राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आमचे काहीही बिघडवू शकत नाही आम्ही त्यांना हप्ते देतो अशी मगरुची भाषा करतांना पाहावयास मिळत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या