💥रांजणी-परतूर दरम्यान लाईन ब्लॉक मुळे दोन सवारी गाड्या उशिरा धावणार...!💥औरंगाबाद ते हैदराबाद सवारी गाडी रांजणी रेल्वे स्थानकावर ५० मिनिटे थांबणार💥

रांजणी आणि परतूर दरम्यान रेल्वे पटरी च्या देखभाल च्या कामाकरिता दिनांक २१ डिसेंबर पासून २९ फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातून तीन दिवस दर  मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी दुपारी १५:२० ते १७:५० पर्यंत २:३० तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, या मुळे पुढील गाड्यांवर परिणाम होणार आहे
१. गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा ते मनमाड सवारी गाडी परतूर रेल्वे स्थानकावर ६६ मिनिटे थांबेल
२. गाडी संख्या ५७५५० औरंगाबाद ते हैदराबाद सवारी गाडी रांजणी रेल्वे स्थानकावर ५० मिनिटे थांबेल.


हा ब्लॉक डिसेंबर महिन्यात २१, २४, २६, २८ , ३१ तारखेला , जानेवारी महिन्यात २, ४, ७, ९, ११, १४, १६, १८, २१, २३,२५,२८,३०, फेब्रुवारी महिन्यात १,४,६,८,११,१३,१५,१८,२०,२२,२५,२७,२९ तारखेला घेण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या