💥नागरिकत्व सुधारणा बिला विरोधात (एनआरसी व सिएए) बिलाच्या विरोधात पूर्णा कडकडीत बंद...!💥मुस्लिमांसह सर्वधर्मिय बांधवांनी मोर्चा काढून तहसीलदारास दिले निवेदन💥

पुर्णा/मुस्लिम बांधव व विविध संघटने तर्फ नागरिकत्व सुधारणा बिलाच्या (एनआरसी व सिएए) विरोधात पुकारण्यात आलेल्या पूर्णा बंदला सर्व समाजाचे लोक सहभागी झाल्याने पूर्णा शहर कडकडीत बंद होते.सर्व शाळा व महाविद्यालयही सोडून देण्यात आले तर दुपारी शुक्रवारच्या नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधव व विविध संघटनेचे लोकांनी मोर्चा काढून सदर बिल केंद्र सरकारने रद्द करावे आशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले
केंद्र सरकारने नुकतेच NRC व CAA बिल संसदेत पास करून मुस्लिम बांधवांच्या नागरिकत्व वर हे केल्याने देश भर याचे तिर्व प्रतिसाद उमटले आहे याबील बाबत सर्वत्र विरोध होताना दिसत असून मोदी व अमित शहा संविधान ला हात लावण्याचा प्रतन्य करत आहे या मुळे संविधान बचाव देश बचाव असे आंदोलने सुरू झाली आहे नुकतेच पूर्णा शहरात मुस्लिम बांधव व विविध संघटने तर्फ या बिलच्या विरोधात निषेध म्हणून आज दि 20 डिसेंबर रोजी पूर्णा बंदची हाक देऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या बंद व मोर्चाला सर्व समाजातील लोकांनी समर्थन दिल्याने व व्यापारी बांधवानी आपआपली सर्व दुकाने बंद ठेवल्याने पूर्णा शहर कडकडीत बंद होते.सकाळीच सर्व शाळा व महाविद्यालय सोडून देण्यात आले दरम्यान शुक्रवारची नमाज अदा झाल्यावर जामा मजिदी समोर जमा झाले होते या वेळी मौलाना सलीम, मुफ्ती बिलाल,मौलाना रशीद,मौलाना वसीम,मौलाना आयुब सह रिपाई नेते प्रकाश कांबळे,डॉ दत्तात्रय वाघमारे ,जामा मजिद्दीचे पेशींमम शमीम रिजवी यांनी मार्गदर्शन करून अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कडाडून टीका करून त्वरित बिल वापस न घेतल्यास व संविधानाला हात लावल्यास तिर्व अदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या वेळी व्यासपीठावर नगरसेवक उत्तम खंदारे,जाकीर कुरेशी, हर्षवर्धन गायकवाड, जाकीर मौलाना,धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, सह आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.यानंतर जामा मजिद्दी समोरून डहाळे चौक, कमाल टॉकीज,बस स्थानक रोड ते चर्च समोर नपा परिसरा पर्यत निषेध मोर्चा काढून तहसीलदाराना आपल्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले या वेळी विविध संघटनेचे लोकां सहित हजारोच्या सख्यनी मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान या बंदला सर्व समाजातील लोकांनी सहभाग घेतलेल्या व्यापारी वर्गाचे व अदोलनात मध्ये सहभागी झालेल्या विविध संघटनेच्या लोकांचे आभार जामा मजिद्दीचे पेशींमम शमीम रिजवी यांनी मानून मोर्चेची सांगता केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या