💥पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव-माटेगाव परिसरात महसुल प्रशासनाचे अवैध रेतीसाठे जप्ती नाट्य...!💥परिसरात मोठ्या प्रमाणात अद्यापही रेतीसाठे जप्ती केवळ ११ टिप्पर ३३ ब्रास रेतीची💥

पुर्णा/तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदी पात्रातून मागील अनेक महिन्यापासून रेती तस्करांनी ताफे व टोकऱ्यांच्या साहाय्याने अवैध रित्या रेती उत्खननास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असून या अवैध रेती अत्खनन आणी रेती तस्करीस महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचा हिरवा कंदिल मिळत असल्यामुळे रेती तस्करांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत असून महसुल प्रशासनाने उभे केलेले रेती तस्करांचे भुत महसूल प्रशासनाच्याच मानगुटीवर बसुन मुग दळत असल्याचे दिसत असून याचा प्रत्यय खुद्द तहसिलदार पल्लवी टेमकर आणी तलाठी तुपसमींदरे यांनाच आला

असून दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२-५० वाजेच्या सुमारास संबंधित अधिकारी आपल्या पथकासह कान्हेगाव शिवारात रेती तस्करी व अवैध रेती उत्खनना संदर्भात कारवाई करण्यास गेले असता त्यांना एका रेती तस्कराने धमकी दिल्याची घटना घडली या घटने नंतर सक्रीय झालेल्या तहसिलदार टेमकर आणी महसुल प्रशासनाने कान्हेगाव-माटेगाव शिवारात रेती तस्करीला लगाम लावण्याच्या दृष्टीने कारवाई नाट्यास प्रारंभ जरी केला असल्याचे निदर्शनास येत असले तरीही रेतीसाठे जप्त करतेवेळी मात्र

अनेक रेती तस्करांच्या रेती साठ्याकडे हेतुपूरस्कर दुर्लक्ष केल्याचे आज मंगळवार दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०१-०० ते ०१-३० वाजेच्या सुमारास कान्हेगाव-माटेगाव शिवारातील अवैध रेती साठे जप्तीच्या केलेल्या कारवाई वरून निदर्शनास येते ही जप्ती कारवाई करतेवेळी महसुल प्रशासनातील कर्मचारी मोरे,पाटील आदींसह अन्य ३ कर्मचाऱ्यांचे पथक ५ टिप्पर १ जेसीबी मशोन आदी साहित्यासह हजर झाले होते यावेळी पथकाने कान्हेगाव परिसरात तब्बल ३५ ते ४० टिप्पर रेती साठे असतांना केवळ ५ टिप्पर रेती जप्त केली तर माटेगाव परिसरात प्रचंड प्रमाणात रेती साठे असतांना केवळ ६ टिप्पर रेती साठे जप्त करुन रेती तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे निदर्शनास येत आहे कान्हेगावातील समाज मंदिर परिसरातील शेत आखाडे,भवानी मंदिर परिसर मसोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अद्यापही मोठ्या प्रमाणात रेती साठे पडून असून याकडे मात्र महसुल प्रशासनाच्या पथकाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने महसुल प्रशासनाच्या या कारवाई नाट्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या