💥राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच वरिष्ठ सनदी अधिकारीच्या बदल्या..!💥माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने केल्या बदल्या💥

मुंबई : आरे मेट्रो कारशेडच्या कामास स्थगिती देतानाच गेल्या सरकारच्या कार्यकाळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच गेल्या सरकारच्या काळातील काही प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.तर महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एम. काकाणी यांची नेमणूक मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या सह निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजल्या जातात.मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा जोशी यांच्या विरोधात अविश्वास आणण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. आपली चिकीत्सा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या योजनेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी शिवसेनेने लावून धरली होती.जोशी यांच्याकडे गेल्याच आठवड्यात घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या