💥सोलापुरात कांद्याला देशात सर्वाधिक २० हजार रुपये किंमत...!



💥कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे💥

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला देशातील उच्चांकी असा २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे. एवढय़ा घसघशीत दरात कांदा विकण्याचे भाग्य अक्कलकोटच्या शेतक ऱ्याला मिळाले. गेल्या महिनाभरापासून सोलापुरात कांद्याच्या दरात तेजी असून गेल्या आठवडय़ापासून हा दर दहा – पंधरा हजारांपेक्षाही वर पोहोचला होता. आता कांद्याच्या किरकोळ दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.सोलापूर बाजार समितीत दिवसभरात २५० मालमोटारीतून २२ हजार ५०६ क्विंटल कांद्याची आवक झाली. शिवानंद पाटील (अक्कलकोट) या  शेतकऱ्याने  आणलेल्या तीन क्विंटल नऊ किलो कांद्याला प्रतिक्िंवटल चक्क २० हजार रुपये दर मिळाला. अतिक दाऊदसाहेब नदाफ या आडत्याकडे हा उच्चांकी दर मिळाला. बाजारात कांद्याला स्थिर दरातही वाढ होऊन ६५०० रुपयांप्रमाणे घसघशीत दर मिळाला. गेल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सोलापुरात कांद्याला कमाल दर ६५०० रुपये मिळालाहोता. आता तेवढाच स्थिर दर मिळू लागलाआहे. बहुतांश शेतक ऱ्यांनी आणलेल्या गुणवत्तापूर्ण कांद्याला १५ हजार ते १६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचा दावाही बाजार समितीच्या प्रशासनाने केला आहे.

व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद -

दरम्यान, बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत कांद्याचा लिलाव सुरू करण्यासाठी बजावले. कांदा चोरीप्रकरणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कशा प्रकारे करायच्या, यासाठी नंतर स्वतंत्र बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, बाजार समितीचे सचिव मोहन निंबाळकर यांच्याशी व्यापाऱ्यांनी आक्रमक पद्धतीने भूमिका घेत वाद घातला होता. सोलापुरात कांद्याचा दर राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक मिळत असताना केवळ कांद्याचे दर पाडण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे याच हेतूने कांदा लिलाब बंद पाडल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित आडते व व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही संतप्त शेतक ऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या