💥पुर्णा पोलीसांनी औंढा नागनाथ येथून मोबाईल चोरट्यास घेतले ताब्यात..!



💥न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सुनावली तिन दिवसांची पोलीस कस्टडी💥

पूर्णा/भरदिवसा शहरातील एका दुकानातून मोबाईल फोन व रोख साडे चार हजार रुपयांची चोरी करुन पोबारा केलेल्या एका चोरट्यांस  दि ५ डिसें  रोजी पुर्णा पोलिसांनी औंढा नागनाथ येथून एकास ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांचा पिसीआर मिळाली आहे.ही कार्यवाही पो.नि.सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन रणखांब, समिर पठाण ,शिवा कदम यांच्या पथकाने केली.
    शहरातील मुख्य रस्त्यावर सुमन मंगल कार्यालयाजवळ  शिवाजी रामराव भालेराव यांचे गौरी  मशनरी स्टोअर्सचे दुकान आहे. दि.८ जुलै रोजी सोमवार आठवडी बाजार होता.त्या रोजी एका चोरट्यांने दुकानात बनावट ग्राहक म्हणून येऊन दुकानदाराकडे  दुकानातील साहीत्याची मागणी केली.यावेळी दुकानदार भालेराव हे सामान काढत असताना त्याने दुकानात गल्ल्याजवळ ठेवलेले साडे चार हजार रुपये रोख व ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन लंपास केला.व माझे पैसे घरीविसरले असे सांगून पैसे घेऊन येतो असं सांगून तेथून पोबारा केला .याप्रकरणी दुकानदार शिवाजी भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुर्णा पोलीस ठाण्यात कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि. सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अर्जुन रणखांब, समिर पठाण, शिवाजी कदम,सायबर सेलचे गणेश कौटकर,राम घुले यांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी तपास सुरू केला. सदरील गुन्ह्यातील आरोपी हा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील सिद्धार्थ लिंबाजी मुळे असल्याचे सायबर सेल कडून निष्पन्न झाल्यास तयास ताब्यात घेण्यात साठी अर्जुन रणखांब,समिर पठाण, शिवाजी कदम, यांचे पथक गुरुवारी ५ रोजी रवाना झाले त्यांनी औंढा पोलीसांशी संपर्क साधून सिद्धार्थ मुळे यास रात्री ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच मोबाईल चोरण्यात चंद्रकांत सदाशिव मुळे हा आणखी  एक आरोपी आहे.औंढा येथे त्याचा शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही.पोलीसांनी त्यास ताब्यात घेत जेरबंद केले आहे.सिद्धार्थ मुळे यास शुक्रवारी ६ रोजी येथिल प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या